तुझ्याविना
तुझ्याविना
=========================================================
=========================================================
वृत्त: हिरण्यकेशी (लगालगा गालगा लगागा | लगालगा गालगा लगागा)
दिनांक: २९ सप्टेंबर २०२६
---------------------------------------------------------
शीर्षक: तुझ्याविना...
कशास या जागवू स्मृती मी, मला पुन्हा आज भास झाला
तुझ्याविना काळ थांबला हा, कठीण माझाच श्वास झाला.
कुठे बुडाले जहाज माझे, कुठे न आता दिसे किनारा
तुझ्याविना वाटते मला की, कठीण माझा प्रवास झाला.
कशास खोटी दिलीस आशा, कशास खोटी दिलीस स्वप्ने
सखी दिले प्रेम मी तुला जे, गळ्यात हा गोड फास झाला.
कित्येक प्याले रडून प्यालो, स्मृतीस नाही दया नि माया
अथांग प्रेमात मी बुडालो, कवी तुझा देवदास झाला.
जलात या आसवे कशाला, कशास रे पंकजा रडावे
कळे न कोणास वेदना ही, तुझ्या जिवालाच त्रास झाला.
---------------------------------------------------------
नाव: पंकज कुमार उत्तम ठोंबरे
गाव: कोंडोली, जि. वाशिम
मोबाईल: ९५०३७१७२५५
=========================================================