प्रेमदीप
प्रेमदीप
ये सखे ये मंद वारा
दवडू नको हा वेळ सारा
चांदण्यातील शुक्रतारा
जवळी घे माझं जवळी घे
रात राणीच्या फुलांचा सुगन्ध तू घेऊन ये
सुरताल एक होता
लय ही गती धरे
निघता झंकार त्यांमधून
प्रेम राग होऊन ये
पौर्णिमेच्या चांदवेला गंधीत तु होऊन ये
या सुगंधी धुंद राती
ये अशी जवळी ये
पुनवेच्या चांद राती
भिजूनी चिंब होऊ दे
बघ हा राणी मोर पिसारा
श्रावणातील अमृत धारा
मंद वाहे गन्ध वारा
श्रावणातील अमृतधारा बरसत ये तू शिंपित ये
निरभ्र ह्या निळगगनी
अवतरला हा इंद्र मणी
कुहू कुहू साद घालुनी
चित चोर तू होऊन ये
केतकीच्या फुलांची माळ तु घालून ये
उजळू दे हा प्रेमदीप
ज्योत तू होऊनी
भावनांच्या या कळ्या ना
फुलवीत ये तू फुलत ये
उजळीत हा प्रेमदीप ज्योत तु होऊन ये

