STORYMIRROR

Gangadhar joshi

Tragedy

3  

Gangadhar joshi

Tragedy

राजे

राजे

1 min
190

( याना आज परत बोलवावे वाटते, त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची आजची परिस्थिती )


ये रे ये रे माझ्या राजा 

कशी आहे तुझी प्रजा

करतात सरदार मजा

सर्व सामान्यांना सजा


नागवली कृषी प्रजा

कर्जाचा घेऊन बोजा

कर्ज मुक्तीचा बेंड बाजा

नुसता करतात गाजावाजा


अस्तनीतील हे साप

दिवसा ढवळ्या करी पाप

मारून भुल थाप 

सर्वांना लावतात चाप


खादाडांची मांदियाळी

अळी मिळी गुप चीळी

कोण उरला नाही वाली

दुःख सोसतोया बळी


परत येरे तु माझ्या राजा

करू नको आम्हा वजा

दाखव तुझा वचक 

निर्माण करावे स्वराज्य


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy