हिंगणघाट
हिंगणघाट
1 min
327
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
कशी गाऊ मी उदास वाणी
बालपणी ती गोजिरवाणी
मोठी झाली ती फुलराणी
भाग्य लाभले स्त्री जन्माचे
समर्पित भाव भोगण्याचे
उजळती पणती सौभाग्याचे
गायलीस तू ती पण गाणी
तुझ्या उदरी राम-कृष्णही
तुझ्याच कुक्षी छत्रपतीही
झाशीची तू लढलीस राणी
तूच लिहलीस तुझी कहाणी
कधी कधी हृदय फाटते
अातड्याला पीळही पडते
निष्पाप निर्भया जिवंत जळते
माणुसकी होते मग अनवाणी
