STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

3  

Gangadhar joshi

Others

जीवन गीत

जीवन गीत

1 min
247

अनादी अनंत युगायुगाचे 

सखे चल गाऊ गीत प्रेमाचे

परंपरा ही हेच सांगते 

चल राणी दिवस फुलायचे


निसर्गाने दिला हा बगीचा

ऋतु बघ आला तो झुलायचा

प्रेमीकाना बहाणा खुलायचा

तुझे माझे गीत एक सुरांचे


तुझेच शब्द माझे प्रेमगीत

जीवनाची आहे ही चालरीत

जीवनयात्रा उघड गुपितं

विरहाने जरासे झुरायचे


तु आकाशातील आहेस चंद्रकोर

मी शुक्रतारा शुभ्र भाव विभोर 

चंद्रचांदणे बघून हसतो चकोर

निस्सीम भक्तीने जगायचे


विविध ऋतूंनी नटतील छान नक्षी

आंब्याच्या झाडावर गातो पक्षी

श्रुष्टी तील चैतन्य होईल साक्षी

असेच आपण सदैव खेळायचे


युगानुयुगे गीत आळवू मिलनाची

चल सखे गाऊ गीत प्रेमाचे


Rate this content
Log in