STORYMIRROR

Gangadhar joshi

Romance Others

3  

Gangadhar joshi

Romance Others

आरसा

आरसा

1 min
347

आरसा 


आरश्यात आज मी

भाग्यरेखा पाहते

खळी गाला वरची

  कशी लाजुन जाते

 

तीळ हनुवटी वरचा

कानी बोलुन जातो

बटा गाला वरच्या

वाऱ्या संगे डॉलतो


नाका वरची नथनी

उगाचच चमकते 

आठवणीने त्याच्या

चेहरा गोरा मोरा होतो


चिमुट भर कुंकु 

भांगेत विलसते

भाळी तीच रेखता

सौभाग्य फाकते


कानी दोन्ही झुमके

अल्लड हलती

हिरव्या काकणाचा

मधुर स्वर निघती


नऊ वारी शालूच

ऐट जरतारी

पदरावरील मोर 

कसा नाचून बोलतो


पाया वरचे पैंजण 

 रुणझुण करती 

कमरेचा मेखला

वेडी वाट पाहती 


साज शृंगार करता

आरसाच बोलतो

भाग्याचे सौभाग्य

रातचा निखळतो



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance