STORYMIRROR

Rahul Salve

Romance

3  

Rahul Salve

Romance

डियर कॉम्रेड

डियर कॉम्रेड

1 min
294

डियर कॉम्रेड,

तू लिहितेस इथल्या व्यवस्थेवर बेधडक

तू बोलतेस सत्य, अन् मांडतेस मत रुबाबदारपणे

तू सांभाळतेस बिकट परिस्थिती घडल्यावर

तू जपतेस भावना शिंपल्यापरी मनातल्या

तू चालवतेस समृद्ध वारसा आदर्श व्यक्तींचा

तू बाळगतेस अभिमान इथल्या मातीचा

तू शिकतेस नवीन काही गोष्टी करण्यासाठी

तू करतेस प्रयत्न नवक्रांती घडविण्यासाठी

तू देतेस लढा स्वबळावर न्यायासाठी

तू लढतेस किल्ला स्वाभिमानासाठी

तू घडवतेस शिल्प स्वातंत्र्याचे

तू साकारतेस स्वप्न दिलखुलास जगण्याचे

तुझ्या ह्या कित्येक गोष्टी 

मनात कायमच्या घर करून जातात...

म्हणून प्रिये, तुझ्यासोबत तुझ्या विद्रोही लेखणीवर

तुझ्या बिनधास्त अन् बेधडक वक्तृत्वावर

तुझ्या विशाल कार्यावर अन् समृद्ध राहणीवर

तू जपलेल्या,जोपासलेल्या असंख्य गोष्टींवर

तू टाकलेल्या समृद्ध पावलांवर

मी मनापासून प्रेम करतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance