STORYMIRROR

Rahul Salve

Romance

3  

Rahul Salve

Romance

प्रेमाची पहिली भेट

प्रेमाची पहिली भेट

1 min
287

प्रेमाच्या पहिल्याच भेटीत

मने आपली जुळली

नजरेची भाषा एकमेकांची

दोघांनाही सारी कळली


स्पंदने हृदयात माझ्या

तुझीच गीत गात होती

पाकळ्या या गुलाबाच्या

तुझाच सुगंध देत होती


एकांतात संवाद आपुला

बहरत असा आला

सुवर्ण हा प्रेमाचा क्षण

फक्त तुझा नी माझा झाला


बेभान या हृदयात

तुझाच चेहरा साठवतो

पावलोपावली प्रेमाचा रस्ता

तुझ्यासोबतच चालतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance