STORYMIRROR

Rahul Salve

Inspirational

3  

Rahul Salve

Inspirational

माय मराठी

माय मराठी

1 min
242

माय मराठी भाषेची

किर्ती जगात गाऊ

गोडवा तिच्या बोलीचा

सर्वांच्या मुखी पाहू


मनामनात अधिराज्य तिचे

गाजत राहील थाटात

समृद्धी अन् संस्कृती

वाढत राहील जगात


तिनेच शिकवले बोलायला

जन्मल्यापासून या जगात

म्हणून लळा मराठी भाषेचा

रुजलाय मना मनात


नाते जोडले तिने नेहमी

साहित्याशी आपलेपणाचे

व्यक्त व्हायला शिकवले

अन् शब्दात मांडण्याचे


अभिमान आम्हा आहे

हीच भाषा आमुची थोर

रानावनात गावागावात

करू मराठी भाषा जागर


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Inspirational