STORYMIRROR

Rahul Salve

Inspirational

3  

Rahul Salve

Inspirational

बाबा...

बाबा...

1 min
233

अंधारलेल्या या जीवनाला

बाबा प्रकाश तुम्ही दिला 

उपेक्षित या समाजाचा

उद्धार तुम्ही केला


शिकवून संघटित करून 

ज्ञानाचा सागर खुला केला

संघर्ष करून जीवनात

क्रांतीचा लढा उभारला


नव्हता अधिकार जगण्याचा

माणूस म्हणून या जीवाला

जाळून त्या मनूस्मृतीला 

समानता दिली भारताला


सन्मानाने जगण्यासाठी

समाज जागा केला

कल्याण होण्या सर्वांचं

बुद्धाचा धम्म दिला


गुलामगिरीच्या विळख्याच

तोडलं ते काटेरी बंधन

स्वातंत्र्य देऊन वंचिताना

मायेचा निवारा दिला


खूप सोसले तुम्ही कष्ट

जागले कित्येक रात्रीला

लिहून संविधान देशाचे

घडवलं नवभारताला


इतिहास ज्यांनी घडविला 

स्मरूनी त्यांच्या स्मृतीला 

कोटी कोटी प्रणाम आमुचे 

युगपुरूष महामानवाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational