STORYMIRROR

Rahul Salve

Inspirational

3  

Rahul Salve

Inspirational

कधी विचार असे येतात...

कधी विचार असे येतात...

1 min
208

कधी विचार असे येतात

हास्य ओठावरचे पुसून टाकतात

धावत्या या जगात एकटेच सोडतात

वृक्षावरची पानेसुद्धा मरगळतात

अशा वेळी धैर्य देणारे

तुझे बोल मला हवेत


कधी विचार असे येतात

गरुडझेप अवकाशात मारून बघावी

गवसलेली पंख तशीच जपावी

अशावेळी पंखात सामर्थ्य देणारी

तुझी हिम्मत मला हवी


कधी विचार असे येतात

दगडाला आकार देताना

स्वतःच्या जीवनाला आकार द्यावा

काट्यावरचा रस्ता मार्ग शोधत

अशावेळी मार्ग दाखवणारे

तुझे दिशातंत्र मला हवे


कधी विचार असे येतात

स्वप्न पाहणाऱ्या या जगतात

कवींच्या ओळीला ओळ द्यावी

तुझ्या मनातली अन् माझ्या मनातली कविता

सदैव जिवंत अन् गात रहावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational