STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

4  

Kishor Zote

Inspirational

भीमाई

भीमाई

1 min
493

संभाजी धर्माजी पंडित मुरबाडकर

भीमाबाई असे त्यांची मुलगी थोरली 

हट्टी स्वभावाची असे तीच

कोणा पुढे कधी ना झुकली....१


रामजी सपकाळ लष्करात

ठरला विवाह कुटुंबात

श्रीमंत बालपन भीमाईचे

रमली सपकाळ घराण्यात....२


संसारात चढउतार

प्रतिष्ठा जपली कामाची

सुभेदार झाल्यावर रामजी

वाट पाहीली माहेरची ....३


आईचा करारीपणा

छोटा भीवा गुण घेतला

भीमराव आंबेडकरांनी

उध्दार जगाचा तो केला....४


अशी थोर माता न होणे

गावे किती गुणगाण तिचे 

वंदन करतो लेखणीने

पावन चरणी भीमाईचे...५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational