वैज्ञानिक कथा ( अभंग रचना )
वैज्ञानिक कथा ( अभंग रचना )


पृथ्वी असे गोल । नसते सपाट ।
वैज्ञानिक लाट । निरंतर ॥ १ ॥
पृथ्वीच फिरते । नाही ती हो स्थीर ।
विज्ञान ते वीर । ठाम असे ॥ २ ॥
सफरचंद ते। गुरुत्वाकर्षण ।
घडे संशोधन । नित्य असे ॥ ३ ॥
जीवन सुकर । करतो विज्ञान ।
मिटवी अज्ञान । मानवाचे ॥ ४ ॥
किशोर मानतो । बुद्ध चिकित्सक ।
तोच वैज्ञानिक । पहिलाच ॥ ५ ॥