STORYMIRROR

Dinesh Kamble

Drama Others

3  

Dinesh Kamble

Drama Others

उणीव माणुसकीची..

उणीव माणुसकीची..

1 min
5.2K


किड्या मुंग्यांसारखी म्हणावी तर,

तशी सुद्दा नाही आजकालची माणसे..

जेथे पाहा तेथे हल्ली फक्त

करतात अरेरावी आजची माणसे...


आयत्या पिठावर रेघोट्या

येथे ओढतात हल्ली माणसे...

खाली पडूनी वरच्याचा जीव

घेतात हो हल्ली माणसे...


अद्वितीय कुटीलपणा

करतात हल्लीची माणसे..

विना काम मिळो मोबदला

इतकीच आस धरतात हल्ली माणसे..


माणसातच माणुसकीची

उणीव आज जाणवली...

निगरगट्ट झालेला पाहुनी माणूस

हळव्या डोळ्यांची कडा पाणावली..


पेटवून द्यावी म्हटलं

मशाल मीच माणुसकीची....

शोध घेतला अंतरी जेव्हा

माझ्यातच उणीव निघाली माणुसकीची ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama