शोकांतिका
शोकांतिका
तसे तुझ्याशी बोलण्यासाठी
माझ्याजवळ आहे खूप काही
पण शोकांतिका अशी की
ते तुझ्यापर्यंत पोचतच नाही
अबोल माझ्या भावनांचा अर्थ
तुला मात्र अचूकच कळतो गं
त्याच कारणाने हा भोळा जीव
पुन्हापुन्हा तुझ्याचकडे वळतो गं
तुझ्या शब्दांतली ओल
माझ्या मनास स्पर्शून जाते
तू माझीच आहेस या कल्पनेने
मन पुन्हा पुन्हा हर्षून जाते

