मित्र
मित्र
पाहून संकटांना, जेव्हा पळून गेला
दिलदार मित्र माझा, शत्रूस मिळून गेला
मित्रा तुझी अवस्था, दयनीय फार झाली
मारात पावसाच्या, वाडा भिजून गेला
दारात काळ जेव्हा,आलास न्यावयाला
पाहून दैन्य माझे, तो हळहळून गेला
येऊन सांत्वनाला, शब्दांनी वार केले
तू मारलेला भाला, हृदयी रुतून गेला
न बोलता मला तू, दारावरून गेला
न मारता कुणीही हा मित्र मरून गेला
