STORYMIRROR

Dinesh Kamble

Abstract Classics Inspirational

2  

Dinesh Kamble

Abstract Classics Inspirational

विश्वास

विश्वास

1 min
40

मन, मस्तिष्क, मनगटावर 

सदा ठेवावा आपण विश्वास 

या तीनही 'म' संगमातून

पदरात पडेल 'यश' हमखास 


मनी आशेची बीजे रूजवावीत 

त्यावर विश्वासाने करावे सिंचन

आणि सातत्याने करावी कर्मसेवा 

त्यानंतर उमलते सुंदर ऐसे मधुबन


प्रेमात विश्वासाच्या वेलीवरती

निकोप नात्याची फूले फुलतात

अविश्वासाच्या विषारी तणाने

नाती गोती सारी कोमेजतात


जेथे असतो गाढ विश्वास 

तेच नाते असते खास 

जेथे नसतोच स्वार्थ काही 

त्यात नसते कुठलीही आस


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract