गुपीत
गुपीत


आकाशाच्या सावलीत
श्रावणात भिजलेलं
हर्षित नयनात
प्रतिबिंबात सजलेलं
मनाच्या खिडकीत
पडद्याआड लपलेलं
ओठांवर गुणगुणताना
वार्यानिशी हरवलेलं
हिरव्या क्षणांच
गुलाबी स्वप्नांच
मनोहारी गुपीत ते...
कातरवेळी रुसलेलं
निस्तब्ध फुलोर्यात
चिरकाळ दरवळताना
माझच मला
उरात सललेलं
अनामिक ओढीत
गुंतलेल्या शब्दांच
अजाण तुज परी
पण सार्यांना ते कळलेलं !!!