आयुष्य
आयुष्य


रात्र संपून जाते
पण शिल्लक राहतात स्वप्न
अपूर्ण पाहिलेली
कारण .. तिथे definition बदलली असते
मग अख्खा दिवस रेंगाळत उभा राहतो डोळ्यासमोर
नवीन definitions लिहिण्याकरिता
निबंधाने मध्यान्ह होते
प्रबंधाने ओसरते दुपार
आणि उतरतो क्षितिजाच्या पायथ्याशी
एक फडफडणारा पक्षी
काही न समजणाऱ्या definitions ना
अंधारात लपवण्याकरता
नव्या केलेल्या definitions ना
पांघरूणासारख ओढण्याकरिता
दिवसभरात बदललेल्या definitions
पुन्हा उमलत्या स्वप्नांची वाट पाहतात
कदाचित... आयुष्याला बदल आवडतो
स्वतःला बदललेल बघण्याकरीता.... !