STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy

4  

Prashant Shinde

Fantasy

भोग...!

भोग...!

1 min
34.3K



भोगासाठी दुनिया सारी

स्वार्थी लोकांची धडपडते

कारण नसता रोजमितीस

फुकाच कडमडते


वाढदिनाचे औचित्य असो की

आनंदाचा जल्लोष

भोग काही चुकत नाही

कितीही करा मग जयघोष

पोटाची मधुर भूक सारी


कशी तोंडावरच जिरून जाते

आनंदाच्या भाकड कल्पने पोटी

उत्सव मूर्ती मग उपाशीच राहते

भोग असे नशिबी येतात

तुम्ही राव असा अथवा रंक

म्हणुनी माजोरी जिरविण्या अन

आनंद हिरावण्या विधाताही मारतो बंक


सुजाण सुज्ञ सुशिक्षित आपण

जाणून घ्या हे इस्पित

हेच आहे परमेश्वराचे मोठे

अनाकलनीय असे गुपित

उघडून डोळे अंतराचे

जाणावे मर्म जीवनाचे


नासाडीचे सारून मनसुबे

भोगावेत सुखमेवे जरून आनंदाचे

तो विधताही खुश होईल

पाहून तुम्हा आनंदात

हाच खरा आहे रे बाबा

मार्ग सौख्याचा जीवनात

अंधत्वाचे अनुकरण करायला

आपण काय दुध खुळे आहोत काय...?


आपल्या संस्कृतीचे औक्षण मायेचे

इतुके चांगले नाही काय...?

आशीर्वादाची ताकद मोठी

भल्या भल्यांनी अनुभवली

म्हणून तर आज माझी

माये पोटी लेखणी अशी पाझरली...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy