STORYMIRROR

Kavita Pudale

Fantasy

4  

Kavita Pudale

Fantasy

आयुष्य

आयुष्य

1 min
41.5K


आयुष्य हे सुंदर आहे

चला आनंदाने जगूया.


क्षणाचे महत्व जाणूया

क्षणाक्षणाचा आनंद लुटूया.

दुरितांचे दुःख जाणूया

तयांस प्रेम देऊया


आयुष्य हे सुंदर आहे

चला आनंदाने जगूया.

.

आयुष्य हे पुन्हा नाही जाणूया

सर्वा आनंदी ठेवूया.

दुःख सारे विसरूया

पुन्हा नव्याने जगूया..


आयुष्य हे सुंदर आहे

चला सुंदरतेने जगूया.


चला नव्याने जगण्यास शिकूया

दुःख घेण्या शिकूया

सुख देण्या शिकूया

आयुष्य नव्याने जगण्यास शिकूया


आयुष्य हे सुंदर आहे

चला आनंदाने जगूया.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy