वेदना...
वेदना...
किती वेदना वेदना
आयुष्याच्या संगतीला
किती दुःखाचा डोंगर
मरणाच्या सोबतीला.....
पेटले पेटले रान
उन्हाच्या झळयाने
पोटाच्या खळगीसाठी
जीव दिला रे बापाने.....
काय सांगू वेदना
जन्म जातीने दिला
कष्ट करून करुन
जीव व्याकूळ झाला.....
आग लावली लावली
जातीने रे जातीची
माझ्या लेकराला आधार
काळ्या मातीच्या आईची....
काळ्या मातीच्या आईची....