भाकर.
भाकर.
किती राबाव राबाव
भाकरीच्या तुकड्यासाठी
किती जाळाव रक्ताला
उद्याच्याला जगण्यासाठी
कष्ट करुन करुन
जीव व्याकूळ झाला
भाकरीच्या तुकड्यासाठी
बाप किती झिजला
उन्ह पेटते पेटते
भान नव्हतं कशाच
बाच्या डोळ्यासमोर
उभं चित्र संसाराच.
किती झिजला झिजला
देह हा जगण्यासाठी
काय सांगू तुम्हाला
भाकरीच्या तुकड्यासाठी .....
भाकरीच्या तुकड्यासाठी .....
