कोंडमारा ......
कोंडमारा ......
1 min
7.1K
कोंडमारा ......
खेळ जीवनाचा तो
दररोज खेळावा लागतो
भाकरीच्या तुकड्यासाठी
पुन्हा संसार मांडावा लागतो....
भावनांचा बाजार
हल्ली दररोज भरतो
मनाच्या अथांग
सागराचा कोंडमारा होतो .....
अशा अनेक सांजवेळा
मनात दाटून येतात
घरांच्या ओढीने पक्षाचे थवे
मनात घर करुन जातात ......
मनात घर करुन जातात .......