STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

4  

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

मजूर- कविता

मजूर- कविता

1 min
42.1K


माझ्या मजूर दादा रे

तुझे जीवन कष्टाचे हाय रे

तुझे इमान कष्टात हाय रे

तुझी हिम्मत कष्टाची हाय रे

जगतो जगासाठी आयुष्यभर

मायमातीचा आधार

नाही कुणाचा लाचार

राबतो जीव आयुष्यभर

तप्त उन, पाऊसात देशभर

माझ्या मजूर दादा रे


रात्र, दिवसाची मेहनत

तुझे श्रमाचे दोन हात

हार नाही तू मानत

तुझ्या झोपडीच्या हवेलीत

माझ्या मजूर दादा रे


कधी नाही अश्रू डोळ्यात

नाही दुःख जगा सांगण्यात

मुकपणे आयुष्य जगण्यात

समाधानी जीवन जगण्यात

माझ्या मजूर दादा रे



नाही हाव श्रीमंतीची

द्वेष भावना नाही कुणाची

भावना ठेवतो मदतीची

आदर मानवाचा राखण्याची

प्रेरणा जगाला देण्याची

माझ्या मजूर दादा रे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy