STORYMIRROR

Prashant Kadam

Tragedy

4  

Prashant Kadam

Tragedy

नव्या नव्या घरात माझ्या !

नव्या नव्या घरात माझ्या !

1 min
42.2K


नव्या नव्या घरात माझ्या

तूझीच याद येत आहे

म्हणून वाटते मला की

अजून घर रितेच आहे


कळेना वाट पाहू कशी मी

कळेना साद घालू कशी मी

अजुनी आभास होत आहे

तुज शिवाय कोण आहे


घरात असूनी मन दूर आहे

तुझ्या समीप सूर आहे

ये परतूनी तू सख्या रे

जीव तुझ्यात गुंतला रे


चैन नाही नव्या घरी ह्या

बेचैनी आहे अंतरी ह्या

नकोस राहू दूर असा तू

हाके सवे धावून ये तू


नव्या अशा माझ्या घराचे

दैव नवे घेवून ये रे

घरपण या नव्या घराचे

बघ तूझ्या येण्यात आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy