Prashant Kadam

Children

4.2  

Prashant Kadam

Children

आई

आई

1 min
335


आई अनंत तुझे उपकार

तुज मुळे हा जन्म मिळाला

जीवनाचा तूच मंत्र शिकवला

दिव्यसृष्टीचा अर्थ समजावला

तूच दिलेस मज संस्कार 

आई अनंत तुझे उपकार


आई अनंत तुझे उपकार

कष्ट सोसून संसार थाटलास

उपाशी राहून घास भरविलास

सहजच प्रत्येक हट्ट पुरविलास

घडविलास प्रेमाचा चमत्कार 

आई अनंत तुझे उपकार


आई अनंत तुझे उपकार

अजुनही चिंता तूलाच माझी

झालीस जरी मुलांची आजी

रात्रंदिन तुज उगाच काळजी

तुझाच मज आधार 

आई अनंत तुझे उपकार


आई अनंत तूझे उपकार

देव दिसे तूझ्याच ठायी

लीन सदैव तुझ्याच पायी

तुझे आशिर्वाद मिळोत आई

राहो प्रेमाची संततधार

आई अनंत तुझे उपकार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children