STORYMIRROR

Kishor Zote

Children Stories

4  

Kishor Zote

Children Stories

पुस्तक ( बालकविता )

पुस्तक ( बालकविता )

1 min
467

मराठीचे पुस्तक माझ्या

खूप खूप आवडीचे

कविता, धडे छान, छान

पुस्तक सदा तेच उघडायचे.....


गणिताचे पुस्तक नुसती

आकृत्या , आकडेमोड 

अभ्यास न करणाऱ्यांची

मोडते बघा पुरती खोड....


इंग्रजीच्या पुस्तकातील

ऱ्हाईम्स फक्त आवडतात

कृती करून म्हणतांना त्या

व्यायाम मग घडवतात......


परिसर अभ्यासातून

होते माहिती भोवतालची

शिवरायांच्या चरित्राची

होते भेट ती इतिहासाची......


कला ,कार्यानुभव

जोड लागते कृतीची

शारीरिक शिक्षण मग

ती पूर्वतयारी खेळाची.....


दाप्तरामधे पुस्तके माझे

खेळीमेळीने राहतात

अभ्यास करण्यास घेतो 

अन् हुषार मला बनवतात....


Rate this content
Log in