जातक कथा( अभंग रचना )
जातक कथा( अभंग रचना )


नितीने वागावे । तैसेची जगावे I
आनंदी रहावे । शिकवण ॥ १ ॥
पहिल्या लिखित । पालि या भाषेत ।
हर विषयात । कथा सार ॥ २ ॥
जीवनाची मुल्ये । असे ओतप्रत ।
शिकवण देत । बुद्ध कथा ॥ ३ ॥
अनेक कथांची । उत्पत्ती त्यातुन ।
शिल आणि ज्ञान । सोबतच ॥ ४ ॥
किशोर सांगतो । जातक या कथा ।
जीवनाच्या व्यथा । दूर करी ॥ ५ ॥