एलियन( अभंग रचना )
एलियन( अभंग रचना )
अंतराळ गुढ । कोणी तरी तिथे ।
असतील जेथे । एलियन ॥ १ ॥
उडे तबकडी । शंका येते मग ।
पडतील भाग । शंका उगा ॥ २ ॥
खिडकीला डोळे । भिंतीलाही कान ।
चाळताना पान । भविष्याचे ॥ ३ ॥
तरंग लहरी । प्रतिसाद देती ।
अस्तीत्व सांगती । एलियन ॥ ४ ॥
किशोर विचारी । कसे ओळखावे ?।
एलियन यावे । पृथ्वीवर ॥ ५ ॥