STORYMIRROR

Jui Deshpande

Drama

3  

Jui Deshpande

Drama

जागा

जागा

1 min
28.1K



आता कुठेही जागा नाही, जाणार तरी कुठे?

कुठे कुणाचे शब्द बोचती, कुठे रुतती काटेकुटे?


आता कुठेही जागा नाही, नाही अगदी हृदयी कोणाच्या

सगळीकडे वादळ चर्चा, सोन्याच्या नि नाण्याच्या


वेदनांना धार आली, संवेदना झाल्या बोथट रे

अरे माणसा, किती कण्हशील, का दुःख बसशील कुंथत रे


माणुसकीचा झरा आटला, हाक जीवाची मुश्किल रे

हसू नाटकी जाहले आणिक अश्रू जाहले कृत्रिम रे


भोवतालची वर्दळ भारी आणि अंतर्मनीचा त्रागा हो

पडत्याला दे हात सावरण्या, माणसा जिवंतपणीच जागा हो ...


Rate this content
Log in

More marathi poem from Jui Deshpande

Similar marathi poem from Drama