STORYMIRROR

Prashant Shinde

Drama Others

3  

Prashant Shinde

Drama Others

रेल्वे प्रवास....!

रेल्वे प्रवास....!

1 min
4.8K


प्रवास सुखाचा ऐसा करीन

तिला चांगलीच फिरवून आणीन

हौस जन्माची अशी पुरविन

विसरेल ती आहे सासुर वाशीण


संगे सोबत शिदोरी घेईन

चणे फुटाणे शेंगदाणे ठेवीन

हळू हळू तिला देईन

काळजी तिची सदा वाहीन


मध्येच स्टेशन येता

थंड पाणी घेईन

थोडे थोडे तिला

हौसेने पिण्या देईन


हवतर मध्येच भेळ

नाही तर वडा पाव घेईन

वाळल्या शेंगा खाता खाता

मध्येच तेही देईन


राणीला माझ्या मी

रेल्वेने सुखात घेऊन जाईन

देव दर्शन तिला

आनंदे मजेत घडवीन


प्रवास रेल्वेचा असा

सुखाचा करविन

सासरचे माहेर असे मी

तिला सहज दाखवीन.....!



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Prashant Shinde

Similar marathi poem from Drama