STORYMIRROR

Hareshkumar Khaire

Drama Fantasy

3  

Hareshkumar Khaire

Drama Fantasy

प्रेम करावं

प्रेम करावं

1 min
1.2K


प्रेम करावं...

आईनं आपल्या मुलांवर

गायींनं चिमुकल्या वासरांवर.


प्रेम करावं...

भावानं आपल्या बहिणींवर

बहिणींनी लाडक्या भावांवर.


प्रेम करावं...

विश्वासू जिवलग मित्रांवर

आणि कट्टर शत्रुंवर.


प्रेम करावं...

मुक्या पशु पक्ष्यांवर

आणि सुंदर निसर्गावर.


प्रेम करावं...

आई आणि बाबांवर

तेवढंच आपल्या साथीदारावर.


प्रेम करावं...

आपण स्वतःवर

स्वतःच्या कामावर.


प्रेम करावं...

आपल्या देशावर

देशाच्या मातीवर.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama