अव्यक्त भावना
अव्यक्त भावना

1 min

335
अव्यक्त भावना । माझ्या मनातल्या।
तशाच राहिल्या । मनामध्ये॥
भावना मनाच्या । सांगाव्या कोणास ।
लज्जा ही मनास । असतेच ॥
भावना मांडाया । प्रयत्न केलेत ।
ना झाली हिंमत । सांगायाची ॥
भावना मनाच्या । मनात ठेवून ।
मरती झुरुन । झुरुनच ॥
भाव हे मनीचे । बाहेर काढावे ।
जगा दाखवावे । त्याचे रूप ॥