STORYMIRROR

Hareshkumar Khaire

Tragedy

4  

Hareshkumar Khaire

Tragedy

गचक अंधारी

गचक अंधारी

1 min
1.5K


गचक अंधारी


गचक अंधारी जीवनात

कसे काय जगावे

कुठे जावे कुठे नाही

मार्ग कसे शोधावे.


गचक अंधारी मार्गावर

काटेकुटे पसरले

चालूनी या मार्गावर

पाय माझे रक्ताळले.


जीव मुठीत घेऊन

चालतो या मार्गावर

नाही त्याचा भरवसा

नेयी कोण्या तीरावर.


गचक अंधारी हे जीवन

खाच खळग्यांचा पथ

आस नाही उजेडाची

येथे अंधाराची साथ.


गचक अंधारी हे जीवन

येथे अंधाराचा सागर

अंधाराच्या लाटांवर

आता आम्ही होतो स्वार.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy