STORYMIRROR

Hareshkumar Khaire

Others

3  

Hareshkumar Khaire

Others

मागे वळून पाहतांना

मागे वळून पाहतांना

1 min
950


मागे वळून पाहतांना


मागे वळून पाहतांना

दुःखाचा डोंगर दिसतो

एक एक आसू डोळ्यातून

गालावर वाहत येतो.


आसवे म्हणती गालांना

मला मनसोक्त वाहू दे

मनात उरलेली दुःखे

सारीच निघून जावू दे.


दुःखे निघून गेल्यावर

मन हलके होईल

पुढचं जीवन जगण्याची

नवी उर्मी येईल.


नव्या उर्मीच्या आधाराने

सुखे वेचत जाईल

आपल्या सोबत साऱ्यांना

सुखाची छाया देईल.


सुखाच्या छायेखाली

सारे आनंदाने राहील

दुःखाला वाटेल हेवा

दुःखच पळून जाईल.


Rate this content
Log in