STORYMIRROR

Hareshkumar Khaire

Others

4  

Hareshkumar Khaire

Others

तुझेच धम्मचक्र हे...

तुझेच धम्मचक्र हे...

1 min
1.3K


तुझेच धम्मचक्र हे...


ज्ञानाच्या या शोधासाठी

सोडिले तुने घरदार

रानोमाळी गावोगावी

भटकला तू होऊन भ्रमर

घोर तपस्या करूनिया

केला ताबा मनावर

मनन, चिंतन करूनिया

मिळविले ज्ञान भांडार

जनकल्याणा धम्मज्ञानाचा

केला प्रचार प्रसार

तुझेच धम्मचक्र हे

फिरते जगात गरगर.


मगधचा तो राजा शूर

चक्रवर्ती सम्राट अशोक

इतिहासात प्रसिद्ध होता

परोपकारी प्रशासक

कलिंगच्या युद्धामध्ये

झाला मोठा संहार

जिवितहानी पाहून उठले

अशोकाच्या मनात काहूर

त्यागली त्यांनी वेद संस्कृती

केला बुद्धांचा स्विकार

तुझेच धम्मचक्र हे

फिरते जगात गरगर.


लहानपणापासून त्याने

साहिला जातियतेचा मार

बालभिमाने शिक्षण घेतले

बसून वर्गाबाहेर

देश विदेशात शिकून आले

ते झाले बॅरिस्टर

लिहून घटना भारताची

ते ठरले घटनाकार

अनुसरून धम्म बुद्धाचा

नागपूरच्या दीक्षाभूमीवर

तुझेच धम्मचक्र हे

फिरते जगात गरगर.


Rate this content
Log in