ये नववर्षा ये...
ये नववर्षा ये...
1 min
600
ये नववर्षा ये...
ये नववर्षा ये...
तुझे स्वागत आहे
येथे आता साऱ्यांना
तुझीच आस आहे.
ये नववर्षा ये...
घेऊन आम्हा काही
आम्हा येथे कुणीच
आधार देत नाही.
ये नववर्षा ये...
गरीबांचा वाली होऊन
अमिर गरीबीची दरी
टाक कमी करून.
ये नववर्षा ये...
सुखाची ढगे घेऊन
आनंदाच्या सरीत
जाऊ दे दुःख वाहून.
ये नववर्षा ये...
घेऊन प्रेमाचा पिटारा
शत्रुही घेईल धसका
पाहून तुझा दरारा.
*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
*दि. १/१/२०१९*
