पानिपतचा संग्राम
पानिपतचा संग्राम


जनता जनार्दन,मायबाप ,
ऐका राजे हो तुम्ही,
शुर मावळ्यांच्या झुंझाराची,
मर्दुमकीची गाथा,
ऐका जी रं जी रं जी रं !!धृ!!
पानीपतच्या रणभूमीवर,रक्त कुणी सांडली!
प्राणपणाने मर्द मराठे,रणांगणी झुंजली !!
हिंदोस्ताची, सीमा लाघूनी,आला अब्दाली!
फितुरांची ही,साथ तयाला बानडगुळी येथली !!
......ऐका जी रं जी र जी र
आक्रमकांना नरसिंह,दत्ताजी आडवा झाला!
मरणासनी असुनी,नजिबा
ला बोलला
" अरे कुत्र्या नजिबा,बचेंगे तो और भी लढेंगे"
पुणे दरबारी खबर ही जाता,
क्रोधाने, तिळपापड झाला !
एक मुखाने निर्णय झाला,
घोष एल्गाराचा झाला....
....जी रं जी र जी र
अन लष्कर निघालं..।
नमन करी गणरायाला
तुळजापुरच्या आईभवानीला..
कोल्हापुरच्या अंबेला,
अष्टविनायक जेजुरीला..
पंढरपुरच्या विठोबाला,
शिंगणापुरच्या महादेवाला..
सथ्जनगडच्या रामदासा,
देहुगांवच्या तुकोबाला...त्रिंबकराज,घृष्णेश्वराला,
आळंदीच्या माऊलीला...
माय मराठी, मस्तक झुकते
नमन छत्रपती शिवरायाला2...
....जी रं जी र जीजी रं...
जिजा माऊली,संभाजीला,
बाजीराव,बाजीप्रभुला..
तानाजी आदी झुंझार वीरांना,
कुलदैवता अन संतांना,
आभाळीच्या पितरांना..
गांवगांवच्या सटवाईला,
गांवगानवच्या म्हसोबाला,
अन गांवगांवच्या हनुमंताला..
येळकोट येळकोट जयमल्हार2
आई उदे आई उदे ग अंबे उदे....
श्रीमंत भाऊ सवे निघाल्या,
शिंदे,होळकरांच्या सेना...
बायकांचे होते काफिले,
भोजनखाऊ बाजारबुणग्यांना...
....... ऐका जी रं जी रं...
मुहूर्ताचा घोळ संपेना,
सुरजकुंडात स्नान करण्या..
गाफिलतेने, डाव साधिला,
दानधर्माचे, पुण्य साधण्या..
गनिम चतुर,कसलेला योध्दा,
डोळ्यात तेल,घालून हो
ता...
रसद संपली,नुसती खाण्या,
चहुबाजूंनी वेढा आवळिता....
भुकेने ते व्याकूळ होते जरी,
हिंमत तयांची नव्हती मेली...
विश्वासाला,घेऊनी ह्रदयी,
रण जिंकण्या वीर निघाली....
.....ऐका जी रं जीर जीर जीरं.
संक्रांतीचा दिवस तो होता,
लष्कर भिडले,गनिमाला...
समशेरी,तलवारी भिडल्या,
रणवाद्यांचा,नाद टिपेला...
हर हर महादेव.जय भवानी जय शिवाजी
दीन दीन,अल्ला हू अकबर....
टपटप घोड्यांच्या टापा,
गर्दी झाली हातघाईची...
तोफांचा धुरळा उडाला,
करी ठाई ठिकरी,गनीमांची....
महाराष्ट्राच्या ,नशिबाचे रण,
दो प्रहरावर,चालत होती,
कधी इकडे,कधी तिकडे होई,
मराठ्यांची सरशी होती..
जरी पटक्याचा मानकरी,
विश्वासराव,आघाडी सांभाळी..
रणांगणी, पाडी विश्वासी,
सुं सुं, गोळी अचानक आली....
.....ऐका जी रं जी र जी र...
जो तो पळे,कच खाऊनी,
गर्दीमध्ये,भाऊ हरविले...
कापिती कोकरे,अफगाण समशेरी,
" विश्वासराव" पडता रण हे फिरले ...
माणिक मोती,पाचु विखुरले,
ठायी ठायी कवड्या पसरली..
घराघरातुनी,मातम होई,
लाख लाख बांगडी फुटली...
ऐका जी रं जीर जी रं....
जमाखर्च हा दोन्ही बाजुचा,
ऐसे रण कधी झाले नाही...
जबरदस्त ,त्या रणबाजीचा,
न भुतो न भविष्यी होणे नाही...
विजयी होऊनी,अब्दाली संपला,
शिख योध्द्यांनी,त्यास हुसकला...
परत फिरूनी हिंदोस्ताच्या,
कधी नाही,वाटेला गेला.....
भळभळत्या,जखमेची थिणगी,
जखम, आक्षची नाही बुझली...
राष्ट्रज्योत,ती सदैव जागवी,
जरी शतकामागूनी,शतके गेली...
पानिपतची गाथा,आमच्या महाराष्ट्राची,
ऐका, सावध होऊनी पुढील हाकेला...
शाहिर " अनिल" म्हणे,स्मरणी ठेवा रणवीरांना,
धन्य तयांच्या बलीदानाला ..।
......ऐका जीरं जी रं जी रं