STORYMIRROR

padmashree chitre

Romance Tragedy

4  

padmashree chitre

Romance Tragedy

कातर..

कातर..

1 min
41.5K


कसे लागले वेड जीवाला

कुठुन जुळले रेशीमधागे

चांदरातीला चांदण्यांसवे

कोण कुणासाठी हे जागे?

कुठुन येइ असा अचानक

प्राजक्ताचा गंध सभोवती

कुणासाठी अन हसता हसता

नकळत डोळे भरुन येती?

कुणासाठी ही लागे हुरहुर

कशासाठी ये भरुन हा उर

कुणासाठी अन आनंदाच्या

क्षणीही उठते मनात काहुर

कोण आठवे फूल पाहता

कोण आठवे सूर लावता

भास कुणाचे होती आणिक

वाटेवरुनी जाता जाता

कसे, कुठे हे प्रश्न निरर्थक

कोण कुणा देणारे उत्तर

तरी खरे की नाव कुणाचे

आठवता मन होइ कातर.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance