क्रांतीज्योती
क्रांतीज्योती
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
फुंकणीच्या ऐवजी
लेखणी हाती दिली
माय सावित्री,तू स्त्रियांची
शतकुळे उध्दारली
तिमिरातुनी अज्ञानरूपी ,
जोतिबांच्या संगतीने
उचलली तू शारदेची,
ज्ञानरूपी पालखी
वाट नव्हती मखमली
अन् मार्ग नव्हता मोकळा
जागजागी अडथळे
अन लोकनिंदेच्या झळा
शेणगोळे फेकले,त्यांनी,
तरी ती झुंजली
ज्योत बनूनी स्त्रीशिक्षणाची,
वादळातही तेवली
शिकलो आम्ही,नवदृष्टी घेऊन
मानसन्मानासवे
राहू कृतज्ञ साऱ्याजणी,
स्वत्व तू आम्हां दिले
आम्ही असू शिखरावरी
पण तूच पाया घातला
प्रत्येक स्त्रीच्या शिक्षणातून
आज तू दिससी जगा
सावित्रीच्या लेकी आम्ही,
तू दिला नवजन्म हा
क्रांतीज्योती सावित्री तू,
आम्ही तुझ्या पाऊलखुणा...
