मनमुग्ध रमणी असलीस जरी
मनमुग्ध रमणी असलीस जरी
मनमुग्ध रमणी असलीस जरी
सौंदर्याचा बहार आहेत डोळे तुझे...
मनमोहक तारुण्यात नटलीस परी
यौवनाचा शृंगार आहेत डोळे तुझे...
गजरा माळून घातलीस जरी वेणी
रातराणीचा सुगंध आहेत डोळे तुझे...
नववारी नेसून फुललीस जरी राणी
साडीची सोनेरी किनार आहेत डोळे तुझे....
दर्शनीय अंगावर खिळली जरी नजर
मखमली तारुण्याचा स्पर्श आहेत डोळे तुझे...
म्हणेन मी केव्हाही, असलीस जरी हजर
भेटीतील रसिली नशा आहेत डोळे तुझे...
गुलाबी थंडित शहारले जरी अंग
रातीला मिठीत उब आहेत डोळे तुझे...
बाहूत तुझ्या रात्री झालो जरी दंग...
ओठात रससरीत ओठ आहेत डोळे तुझे...
(२७-०२-२०१३ | सायं .५:१५ )