टॉपर मुली काय करतात...!
टॉपर मुली काय करतात...!
टॉपर मुली काय करतात...?
टॉ पर मुली काय करतात?
प टकन प्रश्न पाहताच
र टाळ मुलींची यादी
मु स्काटात मारल्यागत चमकली
लि स्ट मोठी पाहून
का य काय वाटले ते
य दाकदाचित तुम्हाला ते पटणार नाही
क चकन ब्रेकचा धक्का बसल्याविन राहणार नाही
र मत गमत शाळा शिकण्याच सवय
ता रुण्याची कोणीच करायची नाही गय
त गमग तडफड सारी दिसायची
नकळण्याचंच होत ना ते वय
वय सरल शाळा सरली
रस्ते फुटले आणि मूलखा वेगळे झाले
सधन,जिद्दी पुढे सरकली
बाकीची गटांगळ्या बहाद्दर
गल्लीलाच दिल्ली समजून
गाव वेशीतच फिरू लागली
इतक्या वर्षा नंतर हुशार मुली
नजरे समोर आपसूक नाचू लागल्या
आणि प्रश्न मनाला विचारू लागल्या
तो कुठे ? हा कुठें ?
तो काय करतो? हा काय करतो?
तोच प्रश्न मित्र मंडळीत फिरला
आणि माझ्या कानाशी आला
टॉपर मुली काय करतात?
टॉपर मुली काय करतात?
प्रश्नाचं उत्तर प्रश्नातच होत
ते मला पटकन भावलं
टॉपर मुली
डोकं खातात
आई बापाला अक्कल शिकवतात
नवऱ्याला मुठीत ठेवतात
मुलांच्या तालावर नाचतात
पैसा अडका कसाही कमवून
मौज मजा मनसोक्त मारतात
उजळ माथ्याने शॉपिंगला जातात
चंगळ वादाचा पुरस्कार करतात
जेंव्हा प्रत्येकाची त्यांना अडचण वाटते
तेंव्हा मात्र त्यांची कीव करावी वाटते
स्त्रीत्व म्हणजे काय
टॉपर मुली जाणत नसतात
बेल निघून गेली म्हणून
वयाला फिगरला दोष देत
जन्मभर रडत बसतात
टॉपर मुलीचं खर तर
गणित जीवनाच कच्चं असत
रडणं पाचवीला पूजलेलं दिसतं
म्हणून तर संसाराच चक्र उलट फिरत
माझंच म्हणणं खर म्हणून
स्वाभिमान अहंकार जपतात
तडजोडीला मूठ माती देतात
आपल्याच पायावर धोंडा मारून घेतात
मग
एकाकी जीवन पदरी पडत
करियरच्या नावाखाली सार लपतं
घोड नेमकं इथंच पेंड खात
आणि सार जीवन चिंतेत जात
चिंतामुक्त जीवनासाठी वेळीच
सद्विवेक बुद्धीची कास धरा
निसर्गालाच गुरू करून
जीवन आपले उज्वल साकार करा...!