गझल-
गझल-

1 min

13.9K
गझल
वृत्त -मेनका
लगावली-
गालगागा गालगागा गालगा
चांदण्यांना बोलतांना पाहिले
राज सारे सोडतांना पाहिले
छेडिल्या तारा मनाच्या आज ही
भावनांना तोलतांना पाहिले
आर्ततेचे सूर कानी गुंजले
काळजाला डोलतांना पाहिले
बरसला पाऊस रिमझिम रेशमी
झाड वेली नाचतांना पाहिले
थांबले मी सुन्न होऊनी अशी
पर मनाला चालतांना पाहिले