STORYMIRROR

Jaya Nere

Inspirational

3  

Jaya Nere

Inspirational

माझं माहेर

माझं माहेर

1 min
14K


माझं माहेर

 

माझ्या माहेरची गोडी,

आहे अवीट ही फार,

येता निरोप मायचा,

मनी दाटे हुरहूर ..!

 

आल्या माहेरवाशिणी,

गळा भेटीही घेतल्या,

सांगे कौतुक रामाचे ,

सभा चौकात भरल्या...!

 

दावी बापाची श्रीमंती,

मन मोठे मोठे वाटे,

माझा कृष्णा बंधूराया ,

घाली ओवाळणी ताटे....!

 

सजली घुंगूरगाडी,

खिलारी ती बैलजोडी,

शुभ्र घोडा असे दारी,

सात मजली हो माडी...!

 

लेक दिल्या घरी जाई

लागे माहेरची साडी,

बंधूरायाची ती भेट

सोबतीस कान कुडी

 

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational