STORYMIRROR

Jaya Nere

Children

2  

Jaya Nere

Children

मी तिरंगा बोलतोय

मी तिरंगा बोलतोय

1 min
16.4K


 

माझ्या स्वप्नात तिरंगा आला

चक्क माझ्याशी बोलू लागला

बघ मी तिरंगा तुझ्याशी बोलतोय

आज मी किती दिमाखात फडकतोय

गात आहेत सारे माझेच गान

जल्लोषात माझ्या विसरलेय भान

चिमुकल्यांना मी तर फारच आवडतो

चित्रकलेच्या वहीत तो मलाच रेखाटतो

रंगाना माझ्या किती असते तेज

शिकवण्यात ती आहेत तरबेज

केशरी सांगे शौर्य स्वतःचे

पांढरा सांगे कौतुक शांततेचे

अशोकचक्र सांगे गती धरा

हिरवा रंग सांगे प्रगती करा

माझ्यासाठी कितींनी सांडलेय रक्त

मीच दिसावा म्हणून लढण्यात व्यस्त

मी जिंकाव म्हणून सांगताय सर्वा

करत नाही कधी जिवाची पर्वा

बोलता बोलता तिरंगा झाला गुडूप

वरुनच हसतोय पहातोय कसा गुपचुप

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children