STORYMIRROR

Varsha Shidore

Children Stories Others

4  

Varsha Shidore

Children Stories Others

जंगल सफर...

जंगल सफर...

2 mins
669

जंगलाचा राजा 

सिंह महाराज 

भलताच आहे 

आज का नाराज ।।१।।


सगळेच करू 

लागले विचार 

चुकला होता का 

काही शिष्टाचार ।।२।।


पण खरी गोष्ट 

सिंहाच्या मर्जीची 

घ्यायची फिरकी

आज सगळ्यांची ।।३।।


सर्वांस होणार 

सफरीची शिक्षा 

ऐटीत फर्मान 

मागा आता भिक्षा ।।४।।


उंदीर बिळात 

हत्ती डबक्यात 

हरीण सुसाट

कोल्होबा वनात ।।५।।

 

ससोबा धावले 

वाघोबा लपले 

मोरोबा उडाले 

सगळे दडले ।।६।।


खारुताई आली 

गंमत कळाली 

राजाला पाहून 

तावात हसली ।।७।।


जंगल मंगल 

आज असे झाले 

कधी नाही ते 

सगळे फसले ।।८।।


जंगल सफर 

करून थकले 

सगळे खाऊन

सामसूम झाले ।।९।।


Rate this content
Log in