मराठी भिनभिनते श्वासात...
मराठी भिनभिनते श्वासात...
इतिहासाच्या पानांवर शोभती
आपुली माय मराठी संस्कृती
महाराष्ट्राचा संत वारसा लेऊनी
मराठमोळा मधूर गोडवा गाऊनी
शब्दांच्या रेलचेलीत विराजमान
होऊनी गद्य-पद्य लेखणीची शान
साधू-संतांची अभंग वाणी खाण
शूरवीरांच्या मायभूमी गौरवी मान
पारंपारिक कलागुणांचा अविष्कार
भक्तीसोबत विज्ञानशास्त्र स्वीकार
यांतुनी मृदू स्वभावाची वसे मुक्ताई
शब्दाशब्दातून पाझरलेली पुण्याई
थोर साहित्यिकांची गाजे कीर्ती
आजही मिरवी कौतुकास्पद मूर्ती
खोचुनी साहित्याचा शिरोमणी तुरा
मराठीचा प्रतिभाशाली बोलका हिरा
उच्च-नीच वाणीचा नाही फरक
वेगवेगळा बोलीगंध सात्विक शौक
परप्रांयीय भाषा देवनागरी रक्तात
शाब्दिक मराठी भिनभिनते श्वासात