जन्म मृत्यू
जन्म मृत्यू
1 min
11.3K
आयुष्य अपुले
जन्म मृत्युचा खेळ
घालवावा वेळ
सक्तर्मी.
जन्म-मृत्यु
दोन घडीचा डाव
ठेवावा भाव
शुद्ध.
जन्मतो जीव
अटळ त्यास मृत्यू
नसावा किंतू
मनात.
होई जन्म
क्षण तो सुखाचा
परी दुःखाचा
मृत्यू.
जपावे परहित
प्राणही द्यावे परार्था
सोडूनि स्वार्था
जीवनात.
चारित्र्य शुद्ध,
चित्ती असेल सद्भाव
निघेल नाव
मरणोपरांत.