विश्व आरशातील प्रतिबिंबातलं
विश्व आरशातील प्रतिबिंबातलं
विश्व आरशातील प्रतिबिंबातलं सत्य शिव आणि सुंदर
दर्शनीय प्रशंसनीय, मनसोक्त जगावं तसं
खरंच खूप सुंदर असतं हे विश्व..
रेघोट्यांनी बांधलेल, भावनांनी विणलेलं
वारंवार बघावस वाटणारं, स्वतः वर भरपूर प्रेम करणारं
हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात संपूर्ण जीवन जगणारं
इच्छा आकांक्षा स्वप्नांना पंख लावणारं
घटकेत अनंताला भेटवणारं
हवं हवसं वाटणारं काळजाच्या कणाकणातून आनंदाची फुले उधळणारं
आरशातील प्रतिबिंबातलं विश्व खरंच खूप सुंदर असतं.
जाणीव करून देतं हे अस्तित्वाची
क्षमता आहे यात सप्तरंगात नाहू घालण्याची
जीवनातील ऊन पावसात विसावा देण्याची
प्रत्येक संकटाला तोंड देण्याची
आरशातील प्रतिबिंबातलं विश्व खरंच खूप सुंदर असतं..
दिवसात एकदा तरी बघा याला निरखून
क्षणांत दुःख जातील विरघळून
उमलेल पुन्हा सुखाचा प्रसून, पुन्हा सुखाचा प्रसून
पुन्हा सुखाचा प्रसून .................